शशी थारूर/ नॅन्सी गिब्ज - लेख सूची

जालियांवाला बाग/अबु घरीब 

13 एप्रिल 1919 ला घडलेल्या एका घटनेने भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचे भवितव्य ठरले. त्या घटनेमुळे स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व गांधींकडे गेले. नेहरू पितापुत्रांनी याच घटनेमुळे इतर विचार सोडून देऊन संपूर्ण स्वराज्याचे उद्दिष्ट स्वीकारले.  दिवस बैसाखीचा, वसंतोत्सवाचा. अमृतसर शहरातील भिंतींनी वेढलेले, एकाच अरुंद बोळातून जा-ये करता येईलसे एक मैदान, नाव जालियांवाला बाग. ब्रिटिश साम्राज्याचा निषेध करणारी एक शांततामय सभा …